Wednesday, December 10, 2008

कस्तुरी

हा मंद मंद पवनी सुगंध
सळ्सळले कोण, दर्वळला गंध
आली कोठुनी गेली कुणीकडे
उभे ठाकले हे कोडे खडे
मी भारलो अन ह्ररपलो
मजला करुनी बेधुंद धुंद.....बेधुंद धुंद
ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....
अवचित झलक दिसली अशी
नकळत पाडुन मजला फशी
मी शोधितो, धुंडाळितो
लावुन गेली नवा छंद छंद....नवा छंद छंद
ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....
फिरे दशदिशा चौफेर मी
दडली कुठे ना कळे कामिनी
मना एक ध्यास छवि पाहण्यास
आतुर जीव बेबंद बंद...बेबंद बंद
ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....ती कस्तुरी ....
ही ओढ अनामिक खुणविते
जागेपणी जणु स्वप्न ते
फिरुनी पुन्हा ये एकदा
नयनास लाभो गुलकंद कंद...गुलकंद कंद
ये कस्तुरी ....ये कस्तुरी ....ये कस्तुरी ....

Thursday, December 4, 2008

हर हर महादेव...!

होताच अवचित स्फोट, धुरांचे लोट,
भडकले चहुदिशेस पलिते
विषण्ण सुन्न आभाळ, धाडे तत्काळ,
मावळा, मेघांचे खलिते
यवनांनी साधला डाव, घातला घाव, आणिली वेळ समराची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

सागराची गाज, दडपेन आज,
दर्पोक्ती बाळगे उरी
भ्याडांचा माज, शिखंडी बाज,
आलेच कसे या धरी ?
बोलविते ते धनी, आहे जे कुणी,
खात्रीने मुर्ख शंभरी
चाळलाच असता, इतिहास नुसता,
नसतेच चढले पायरी
महाराष्ट्र भुमी, ठेचतेच कृमी, आहे नोंद काळपर्वाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

गवताचे भाले, निमिषात झाले,
मरहट्टे रक्त सांडती
सह्याद्रीसाठी, हिमालयापाठी,
दख्खनही धावे मागुती
मुषक ते टिपले, बिळात लपले,
देऊन स्वंये आहुती
शहिदांच्या गजरा, मानाचा मुजरा,
नतमस्तक येथे धरती
पण आहेत अजूनी प्यादी, गैर अवलादी, दडलेली जात्यंधाची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची

बाघाच्या जबड्यात, घालूनी हात,
मोजतील कसे हे दात ?
कैसे जन्मा येती, वीर त्या प्रती,
या अशा षंढ पाकात
हिरवी पिलावळ, फक्त वळवळ,
ही एवढीच औकात
नेस्तनाबुत, करण्या हे भुत
पुरे एक आघात
जाहले बहूत इशारे, फुरफुरणारे, छाटावी जात गारद्यांची
हर हर महादेव गर्जना, गर्जु दे पुन्हा, रायगडा, रात्र वैर्‍यांची